-->

[PDF सहित] मराठी पत्र लेखन | Patra Lekhan In Marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रानो तुम्हाला मराठी पत्र लेखन येत नाही? तर काळजी करू नका patra lekhan in marathi ही पोस्ट वाचल्या नंतर तुम्हाला patra lekhan करण्यात काहीच अडचण येणार नाही.

मी तुम्हाला या पोस्ट मध्ये अगदी सोप्या भाषेत marathi patra lekhan कसे करायचे? हे सांगणार आहे. आणि तुम्हाला patra lekhan in marathi pdf ही देणार आहे. जनेकरून तुम्ही प्रिंट काढू शकाल.

पत्र लेखन हे मराठी उपयोजित लेखनाचे महत्वाचे भाग आहे.

पत्र लेखन (patra lekhan in marathi)

patra lekhan in marathi

मित्रानो पत्र लेखन हे पत्र लेखन मराठी 9वी, 10 वी, 11वी आणि 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे कारण पत्र लेखन मराठी, हिंदी आणि इंग्रजी च्या पेपर मध्ये नक्की विचारले जाते.

(ads1)

मित्रानो आधी जसे पत्र लिहीत होतो तसे आता लिहायचे नाही कारण आता पत्र लेखनाचे pattern बदलले आहे. आता patra lekhan हे email format मध्ये लिहायचे आहे.

चला तर पाहूया E-mail format मध्ये पत्र लेखन कसे करायचे. ☺️

patra lekhana चे दोन प्रकार आहेत पहिले औपचारिक पत्र लेखन आणि दुसरे अनौपचारिक पत्र लेखन हे दोन प्रकार आहेत.

औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनात वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप

औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखनात वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप

(ads1)

पत्र लेखनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला संक्षेपाचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. खाली दिलेल्या टेबल मध्ये औपचारिक patra lekhanat वापरले जाणारे संक्षेपाचे स्वरूप आहेत.

श्रीम.श्रीमती
चि.चिरंजीव
श्री.श्रीयुत
स. न. वि. वि.सप्रेम नमस्कार विनंती विशेष.
शि. सा. न. वि. वि.शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष.
सा. न. वि. वि.साष्टांग नमस्कार विनंती विशेष.
ती.तीर्थरूप
सौ.सौभाग्यवती

आता पाहूया औपचारिक पत्र लेखन मराठी आणि नंतर अनौपचारिक पत्र लेखन मराठी. 😊

औपचारिक पत्र लेखन मराठी

औपचारिक पत्र लेखन म्हणजे काय? औपचारिक (OFFICIAL) पत्र हे मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, संपादक, अधिकारी, company ला, कार्यालयातील व्यक्तीला आणि इतर यांना लिहले जाते.

औपचारिक पत्र लेखन मायना ( E-mail Format )

औपचारिक पत्र लेखन

मी तुम्हाला येथे text, image आणि pdf format मध्ये औपचारिक पत्र लेखन आराखडा दिला आहे ते तुम्ही download करू शकता.

(ads1)

दि….जानेवारी 2021

प्रति,

मा. (पद)……………………………

…………..(हुद्दा, पत्ता)…………….

……………………………………….

विषय…………………………………………

महोदय,

……………………..……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………….

पत्राचा शेवट

( पूर्ण नाव)

(पत्ता)

(ईमेल आयडी)

टीप: प्रश्न पत्रिकेत नाव आणि पत्ता दिला असेल तर तेच टाका. नसेल दिला तर तुम्ही स्वतःचे नाव आणि पत्ता टाकू शकता.

PDF Preview

Download Pdf(download)

(ads1)

Patra Lekhan In Marathi YouTube Video

औपचारिक पत्र लेखनाचे काही नमुने

मागणी पत्र लेखन

रसिक वाचक या नात्याने संबंधीत व्यक्तीला स्वतःसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा.

मागणी पत्र लेखन

दि. २ डिसेंम्बर २०२१

प्रति,

मा. व्यवस्थापक

अभिषेक पुस्तकालय

१०१ गंज गोलाई गाळा क्र.१ 

लातूर – ४१३५१२

        विषय : पुस्तकांच्या मागणी बाबत

महोदय,

स.न.वि.वि.

मी रसिक वाचक या नात्याने अभिषेक पुस्तकालय वर्धापनदिनानिमित्त तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते आपण वर्धापनदिनानिमित्त रसिक वाचकांसाठी २०℅ सवलत ठेवल्याबद्दल अभिनंदन मला माझ्या आवडीची काही पुस्तके हवी आहेत.

ती पुस्तके मी मागवू इच्छितो पुस्तकांची यादी तपशीलवारपणे सोबत जोडत आहे. कृपया मागवलेली सर्व पुस्तके लवकरात लवकर पाठवावी पुस्तकासोबत बिलही पाठवावे. आपण या पुस्तकावर योग्य अशी सवलत दयाल असा विश्वास आहे.

पुस्तकांची यादी खलील प्रमाणे आहे.

अनुक्रमांकपुस्तकाचे नावलेखकाचे नावप्रति
श्यामची आईसाने गुरुजी
ययातीवि.स. खांडेकर
नटसम्राटवि.वा. शिरवडकर
झोंबीआनंद यादव
अपूर्वाईपु.ल. देशपांडे

वरील पुस्तके वेळेत पाठवावी ही विनंती. 

आपली विश्वासू, 

मेघा गायकवाड

गोपाळ नगर.

ईमेल: [email protected]

PDF Preview

Download PDF(download)

(ads1)

________________________________________________________________________________________________

विनंती पत्र लेखन

मित्रानो आम्ही येथे काही विनंती पत्र चे नमुने दिले आहेत आणि तुम्ही खाली दिलेल्या विनंती पत्राचे pdf ही download करू शकता.

शाल्येय भांडार प्रमुख या नात्याने संबधित व्यक्तीला शाळेसाठी मागवलेल्या पुस्तकांवर अधिक सवलत देण्याविषयी विनंती पत्र.

४ डिसेंम्बर २०२१

प्रति,

मा. व्यवस्थापक,

अभि पुस्तकालय,

गाळा क्र. २

लातूर – ४१३५१२

विषय: पुस्तकावर अधिक सवलत देण्याबाबत.

महोदय ,

स.न.वि.वि.

आजच वर्तमानपत्रातून आलेले आपल्या पुस्तकालयाच्या वर्धापनदिनाबाबतचे पत्र वाचले. आणि आनंद झाला. वर्धापनदिनानिमित्त आपण पुस्तक खरेदीवर २०℅ सवलत जाहीर केली आहे.

आपले आनंद पुस्तकालय आणि आमची शाळा यांचे गेल्या अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे. गेली अनेक वर्ष आपण आमच्या शाळेला लागणारी सर्व प्रकार ची पुस्तके पुरवीत आला आहात.

सध्या पुस्तकांच्या किमती वाढल्या आहेत शाळेचे अनेक खर्च मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

शासनाकडून मिळणारे अनुदान वाढत्या खर्चाला पुरे पडत नाही. अली कडे देणग्या मिळणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. म्हणून आपल्याला कळकळीची विनंती आहे की, आपण आपल्या वर्धापनदिनानिमित आमच्या शाळेला पुस्तक खरेदीवर २०℅ पेक्षा जास्त सवलत दयावी. आम्ही आमच्या पुस्तकाची यादी चार दिवसा आधी आपल्या कडे पाठवली आहे.

आपल्या अनुकूल प्रतिसादाची आम्ही वाट पाहत आहोत. सवलत वजा जाता येणारी देय रक्कम कृपया ई-मेल ने कळवावी म्हणजे ती रक्कम आम्ही आपल्या बँक खात्यात त्वरित जमा करू.

कळावे

आपला नम्र

अ.ब.क. 

शालेय भंडार प्रमुख

श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय

जुना औसा रोड लातूर – ४१३५१२

ई-मेल: [email protected]

PDF Preview

Download PDF(download)

(ads1)

_______________________________________________

अनौपचारिक पत्र लेखन मराठी

अनौपचारिक पत्र हे आई-वडील, बहीण-भाऊ, नातेवाईक, मित्र, अभिनंदन, सुख दुःख इतर कामांसाठी लिहले जाते. अनौपचारिक पत्रात तुम्ही 10 वि च्या परीक्षेत शाळेतून प्रथम आल्या बद्दल अभिनंदन करणारे पत्र असे पत्र ज्यांचा औपचारिक गोष्टींशी काहीही संबंध नाही अश्या पत्राला अनौपचारिक पत्र असे म्हणतात.

अनौपचारिक पत्र लेखन मायना

आता आपण पाहूया अनौपचारिक पत्र लेखनाचा आराखडा

Image

 Content

Pdf Preview

Pdf download

अनौपचारिक पत्र लेखनाचे काही नमुने

आम्ही येथे काही अनौपचारिक पत्र लेखनाचे काही नमुने दिले आहेत.

अभिनंदन पत्र लेखन मराठी

(ads1)

साहित्य संपदा या दिवाळी अंकात तुमच्या लहान भावाची कविता प्रकाशित झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

दि. 2 नोव्हेंबर 2021

प्रिय, महेश

अनेक आशीर्वाद

महेश तुझे मनपुर्वक अभिनंदन! साहित्य संपदाच्या दिवाळी अंकात “चिमणी वाचवा” ही कविता वाचली. मला ती कविता खूप आवडली कवीचे नाव वाचले तर आमचे छोटे बंधुराज महेश यांचे नाव दिसले. मला तुझा खूप अभिमान वाटला.

महेश तू सध्या सातवीत आहेस पण तुला पक्षी जगताच्या भावना समजून घेता येतात. तुझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे तुला पक्ष्यांचे निरीक्षण करायला खुप आवडते. त्यांचे तू फोटो घेतोस त्यांच्या सवयी खाणे-पीने यांच्या नोंदी ठेवतोस. हे सगळे करताना तू त्याच्या भाव विश्वा जवळ जातोस त्याचाच चांगला परिणाम तुझं म्हणजे तुझी चिमणी वाचवा ही कविता आई बाबांना तुझ्या काव्यनिर्मितीचा निश्चित अभिमान वाटला असेल भविष्यात तू विविध विषयांवर साहित्यलेखन करावे यासाठी शुभेच्छा! त्यासाठी भरपूर पुस्तके वाच. मनन कर निरीक्षण कर. मोठी बहीण म्हणून हक्काने हे सुचवते. हाच मेल मी नागपूर कोलक्त्याच्या आपल्या चुलत भावंडाना पाठवत आहे. पुन्हा एकदा अभिनंदन.

तुझी ताई

अ. ब. क

गोपाळ नगर लातूर

मराठी पत्र लेखन – Patra Lekhan In Marathi FAQ

निष्कर्ष

मित्रानो मी तुम्हाला पत्र लेखन मराठी (patra lekhan in marathi) या पोस्ट मध्ये नवीन patra lekhan pattern चे pdf, images दिले आहेत. आणि सोबतच औपचारिक पत्र लेखनाचे नमुने आणि अनौपचारिक पत्र लेखनाचे नमुने सुद्धा या पोस्ट मध्ये दिले आहेत.

तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या ब्लॉग ला bookmark मध्ये शेअर करा आणि facebook page ला follow करा जने करून तुम्हाला अश्या आणखी शैक्षणिक पोस्ट चे updates मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र.

Baca juga

Post a Comment